
पंढरपूर (प्रतिनिधी)
यंदाची आषाढी वारी न भूतो न भविष्यती अशी झाली. भाविकांच्या अचानक वाढलेल्या संख्येमुळे प्रशासन नुसते चक्रावून गेले. तरीही कोणतीही अनुचित घटना न घडता, यंदाची वारी सुटसुटीत झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. १५ ते १७ लाख
भाविक पंढरीत येतात, तरीही त्यांना कोणताही त्रास होतं नाही, यामागेl होते वारीचे सूक्ष्म नियोजन.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यंदाच्या वारीचे सूक्ष्म नियोजन केले होते. पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे आणि तहसीलदार सचिन लंगुटे हे दोन्ही अधिकारी नवीन होते. याच वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले
यांनाही पंढरपूरच्या वारीचा अनुभव नव्हता. प्रथमपासूनच यंदाची वारी मोठी भरणार ,असे आखाडे येथील प्रशासनाने बांधले होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही वारी प्रथमपासूनच मनावर घेतली होती. २१ जून रोजीच त्यांनी पंढरपूरच्या पत्रकारांची संवाद साधून,
वरीतील बारकाव्यांची माहिती घेतली होती.
यानंतर प्रशासनाबरोबर तीन बैठका घेऊन नियोजन केले होते. वारीच्या अगोदर दोन दिवसापासून त्यांनी पंढरपूरमध्ये मुक्काम ठोकला होता. विठुरायाची दर्शन रांग, व्हीआयपी दर्शनास बंदी, पंढरीतील गर्दीवरचे नियंत्रण, यावर त्यांनी अगोदरच मार्ग काढले होते. त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन सार्थ ठरले.
पंढरीत आलेल्या भाविकांनी यंदाची वारी सुखकर झाल्याचे बोलून दाखवले. आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वारी. प्रशासनातील सर्वच अधिकारी नवीन, परंतु जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या नियोजनामुळे ही वारी भाविकांना सहज सुलभ वाटली.
*टोकन दर्शन पद्धत लवकरच अमलात आणणार*
पंढरीतील विठुरायाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन पद्धत लवकरच अवलंबण्यात येईल, याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी करून घेतली. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावर असेपर्यंत हे काम आपण नक्कीच मार्गी लावू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शुक्रवार दि. १९ जुलै रोजी त्यांनी विजयी अविर्भावात पंढरपूर सोडताना, पत्रकारांची संवाद साधला. पत्रकारांनी वारी सुखकर होण्यासाठी साथ दिल्याबद्दल, त्यांनी पत्रकारांचे आभार मानले.