राजकियसामाजिक

राज्यातील पहिल्या मराठी समाज भवनच्या बांधकामाचा पंढरीत शुभारंभ

आ. अवताडे यांच्या प्रयत्नास आले यश

पंढरपूर (प्रतिनिधी)

मराठा समाजासाठी उभारण्यात येणारे राज्यातील पहिले मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून, या मराठा भवनाच्या मंजुरी पासून ते पायाभरणी शुभारंभापर्यंत आ. समाधान आवताडे यांनी सरकारची पाठ न सोडता पाठपुरावा केल्यामुळे, पाच कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. हा निधी कमी पडत असून आणखी दहा कोटीची मागणी समाधान आवताडे यांनी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने केली असून, त्या निधीची तरतूद ही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

२२ नोव्हेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता, सकल मराठा समाज पंढरपूर यांच्या वतीनेही देवेंद्र फडणवीस यांना मराठा भवनाचे निवेदन देण्यात आले होते. त्याचबरोबर १५ डिसेंबर २०२३ रोजी आ. समाधान आवताडे यांनी रात्री बारा वाजता, मराठा भवन व सारथीच्या केंद्र उभारणीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती. २ फेब्रुवारी २०२४ रोजी गजानन महाराज मठाच्या पाठीमागील जागा मराठा भवनासाठी देण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आला होता. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ही वेळी वेळी पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून २०२४ रोजी मराठा भवनासाठी निधी मंजूर केला असल्याचे घोषित केले.

त्यानुसार १७ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, मराठा भवनाचा पायाभरणी शुभारंभ करण्यात आला असून, लवकरच हे भवन साकार होणार असल्याने मराठा बांधवांनी आ आवताडेंचे आभार मानले आहेत. सदर प्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन श्री.नागेश भोसले, मा.नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, दिपक वाडदेकर, महेश साठे, महेश डोंगरे, अमरजीत पाटील, संतोष कवडे, अनिकेत देशमुख , शंकर सूरवसे, भास्कर जगताप, सुमित शिंदे, संदीप आबा पाटील, शरद चव्हाण सर, बापूसाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close