बेचाळीस गावातील जनता मला पोरकं पाडणार नाही – अभिजीत पाटील
तालुक्यातील जनतेला केले भावनिक आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल कारखाना निवडणुकीत दिलेला शब्द
मी पाळला आहे, पवार साहेबांचे या मतदार संघावर विशेष लक्ष आहे. त्यांना गड राखायला दिला होता, परंतु ते मालक होऊन बसले. यामुळेच करकंब परिसरात समस्यांचा ढीग साठला आहे. पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मला एक वेळ संधी द्या, त्या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकी प्रमाणेच या ४२ गावातील जनता मला साथ देईल असा विश्वास आहे, ही जनता मला पोरकं पाडणार नाही, असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. ते करकंब येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी खा.अमोल कोल्हे हे प्रमुख उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील
यांची प्रचारसभा करकंब येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत खा. अमोल कोल्हे यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. यानंतर बोलताना उमेदवार अभिजीत पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील माढा विधानसभा मतदार संघास जोडण्यात आलेल्या ४२ मतदारांबाबत मोठा विश्वास व्यक्त केला.
या निवडणुकीत जनतेने साथ दिल्यास, करकंब येथे नगरपंचायतीस मंजुरी आणली जाईल, करकंब येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात येईल, भीमा नदीवर बंधाऱ्याची उंची वाढवून येथील शेतकऱ्यांच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवला जाईल, मुस्लिम दफनभूमीचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे सांगून अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीत जनतेने आपल्याला साथ द्यावी असे आवाहन केले.
या मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, विरोधक मात्र मुद्द्यावर बोलत नाहीत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. करकंब येथे अनेक संतांच्या पालख्या मुक्कामी असतात, परंतु येथे कोणतीही सोय होत नाही. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही, बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे, जगातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, या ठिकाणी नगरपंचायत नसल्याने कोणताही निधी येत नाही, या अगोदरच्या लोकप्रतिनिधींना हा गड राखायला दिला होता, परंतु ते मालक झाले. आता पवार साहेबांनी मला निवडणूक रिंगणात उतरवले आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकी वेळी जनतेने मला मोठी साथ दिली. मीही दिलेला शब्द पूर्ण केला, आता या निवडणुकीत साथ द्यावी, बेचाळीस गावातील जनता मला पोरकं पाडणार नाही , विश्वास त्यांनी या सभेत बोलून दाखवला.
यावेळी यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, मा. जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे , शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे नितीन नागणे, ज्योती कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, बाबूतात्या सुर्वे, विष्णू भाऊ बागल, सुधीर भोसले, विजय भगत, करकंबचे जेष्ठ दिलीप पुरवत बी.एस पाटील, अमोल शेळके, खरे गुरुजी यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि करकंब परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.