राजकिय

अभिजीत पाटील आमदार झाल्यास माढ्यावर शरद पवार यांचे खास लक्ष

महाराष्ट्र धर्म जपण्याची ही निवडणूक - खा. अमोल कोल्हे

पंढरपूर (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे काम केले. याच पद्धतीने अभिजीत पाटील यांनी सहकारातून मोठे काम केले आहे. यामुळेच शरद पवार साहेबांची खास मर्जी त्यांच्यावर आहे. यामुळेच अभिजीत पाटील यांना साहेबांनी माढ्याच्या मैदानात उतरवले आहे. ते आमदार झाल्यावर, शरद पवार साहेबांचे या मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांचा हा पट्टा आमदार होणार आहे ,असा विश्वास खा. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

लोकसभेला फटका बसल्यानंतर, महायुती सरकारने मतांवर डोळा ठेवून अनेक योजना काढल्या. शेतमालाच्या भावाकडे मात्र दुर्लक्ष केले. यामुळे राज्यात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. याचवेळी सत्ताधाऱ्यांकडून उद्योगपतींना कर्जमाफी दिली जात आहे. यामुळे राज्यातील शेतकरी सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले. यामुळे विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्रधर्म जपण्याची निवडणूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीला येथील जनता दिल्लीच्या तक्तासमोर झुकली नाही, त्यांना धडा शिकवला. याही निवडणुकीत जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवेल, असा हल्लाबोल खा. अमोल कोल्हे यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना त्यांनी उमेदवार अभिजीत पाटील आणि शरद पवार यांच्यातील संबंधांवर खुलासा केला. सहकारात मोठे काम केलेल्या अभिजीत पाटील यांच्यावर शरद पवार यांची खास मर्जी आहे. यामुळेच अभिजीत पाटील आमदार झाल्यास, या मतदारसंघावर शरद पवार यांचे खास लक्ष राहणार आहे. शरद पवार यांचा हा पठ्ठ्या या निवडणुकीत आमदार होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा करकंब येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, माजी जि.प.सदस्य भारत आबा शिंदे, संजय कोकाटे, संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, काँग्रेसचे नितीन नागणे, ज्योती कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, बाबुराव सुर्वे, विष्णूभाऊ बागल, सुधीर भोसले, विजय भगत, करकंबचे दिलीप पुरवत, बी.एस.पाटील, अमोल शेळके, खरे गुरुजी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, आणि करकंब परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close