
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील बिटरगाव येथील जि.प.
प्राथमिक शाळेत देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते देविदास कसबे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सरडे हे होते. प्रथमतः कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देविदास कसबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे झाली. विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे यांनी, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांच्या पराक्रमावर आपले विचार मांडले.
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, सर्व विद्यार्थी मित्रांना वहयाचे वाटप उपस्थित मान्यवर व गुरुजन वर्गाच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच भाऊसाहेब धुमाळ, उपसरपंच हरी धनवे, ग्रामसेवक हनुमंत खवळे, माजी सैनिक गोविंद भगत , युवा नेते बाबासो धुमाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार मॅडम, ज्ञानेश्वर माने गुरुजी, अंगणवाडी शिक्षिका सौ शितल धुमाळ मॅडम, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव, सदस्य अनिल खंदारे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष जनार्दन पन्हाळकर, ग्रामपंचायत सदस्य महादेव यादव, समाधान महानोर, ज्येष्ठ नागरिक नागनाथ धुमाळ, नामदेव कदम,दिगंबर सरडे, गणेश यादव, चितांमणी घाडगे,विलास चव्हाण,गणेश सरडे, विष्णू धुमाळ, सागर धुमाळ, गणेश घाडगे, महादेव चव्हाण, संभाजी चव्हाण तसेच आशा वर्कर रूपाली मोहिते, अंगणवाडी मदतनीस भारती धनवे, बचत गटाच्या बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.