
पंढरपूर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात लोकप्रीय असलेला गणेशउत्सव डॉल्बी सिस्टीम न लावता साजरा करा, गणेश उत्सव शांततेत पार पाडा, आम्ही कौतूक करु असे उदगार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. टी. वाय. मुजावर काढले. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते.
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गणेश मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, पोलीस निरिक्षक टी. वाय. मुजावर, सपोनि. विश्वास पाटील, पोसई विक्रम वडणे उपस्थित होते. त्याचबरोबर याप्रसंगी गेल्या वर्षी ज्या,ज्या मंडळांनी गणेशोत्सव काळात शिस्तबद्ध मिरवणूक काढल्या होत्या, त्या ११ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा डॉ. अर्जून भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पोनि मुजावर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन मंडळांनी करावे, तसेच प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती असावा, गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये डॉल्बी लावण्यात येऊ नये, तसेच पारंपरिक वाद्य जास्तीत जास्त मंडळाने लावावेत, त्याचबरोबर आवश्यक परवानग्या घेण्याबाबतची माहीतीही पदाधिकाऱ्यांना यावेळी मुजावर यांनी दिली.
*या मंडळांचा पोलीस ठाण्यात सत्कार*
शिवरत्न गणेश मंडळ (लक्ष्मी टाकळी), क्रांतीनाना पाटील गणेश उत्सव मंडळ (सिध्देवाडी), गणेश तरुण मंडळ कोंडरकी, सन्मित्र गणेश मंडळ (शेगाव दुमाला), आंबिका मध्यवर्ती गणेश मंडळ (सुस्ते), विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ (भटुंबरे), श्री गणेश तरुण मंडळ (सिध्देश्वर वस्ती), बाल गणेश मंडळ (अजनसोंड), जय जय अंबे गणेश उत्सव मंडळ (सुस्ते), श्रमीक तरुण मंडळ (लक्ष्मी टाकळी) बाल गणेश बहुउद्देशीय संस्था (तारापूर) या मंडळांचा पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.