
पंढरपुर (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुरसाळे, या पतसंस्थेची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पंढरपुर येथील संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीत संपत्र झाली. या संस्थेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती, चेअरमन शहाजी साळुंखे यांनी दिली.
यावेळी पंढरपुरचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या प्रतिमेचे, संस्थेचे संस्थापक मा. कै. औदुबररावजी पाटील, (आण्णा), महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार मा. कै. यशवंतराव चव्हाण, सहकार शिरोमणी मा. कै वसंतराव काळे, कै. नारायण मोरे (दादा) यांचे फोटोपुजन करुन, संस्थेचे जेष्ठ सभासद, मार्गदर्शक तथा सहकार शिरेामणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठठल परिवाराचे नेते युवराज पाटील, यांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन सभेच्या कामकाजास सुरवात झाली.
यावेळी उपस्थित सभासदांचे स्वागत संचालक शंकर कवडे यांनी केले, तर संस्थेचे संचालक बापुसाहेब दांडगे यांनी चालु सालात दिवंगत झालेले संचालक कै. ज्ञानोबा शामराव घाडगे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली. संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे आपले मनोगत वाचन करताना, सभासद ठेवीदार याचे विशेष आभार मानून, संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाचन केला. संस्थेची वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्याने ७० कोटीकडे झाली आहे. वार्षिक उलाढाल ही सभासदांनी लावलेला हातभार व संस्थेचा वाढलेला प्रगतीचा आलेख पाहता त्यानी दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून , संस्था ७० कोटीकडे वाटचाल करीत आहे. चालु वर्षी संस्थेस ४९.१९ लाख नफा झाला आहे असे सांगून, सभासदांना दरवर्षी प्रमाणे दिवाळी सणाकरीता १० % लाभांश, सक्तीचे ठेवीच्या व्याजावर खातेदाराचे बचत खातेवरुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. संस्थेचे सभासद कर्जदार यांना आवाहन करताना सुचना केली की, आपण संस्थेकडुन घेतलेली कर्जे थकीत न घालवता वेळेत भरुन संस्थेची जास्तीत जास्त कर्जवसुली होणेसाठी सहकार्य करावे, तरच संस्थेचा प्रगतीचा जास्तीत जास्त आलेख उंचावेल, व वसुलीकरीता कायदेशिर कार्यवाही करणे वाचेल असे साळूंखे यांनी सांगीतले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक कल्याणराव काळे म्हणाले की, आज संस्थेची वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्याने ७० कोटीकडे झालेली आहे. हीच सभासदांनी दिलेली चांगल्या कामाची पाहोच पावती आहे. अशीच पुढे वाटचाल रहावी असे संचालकांना सांगून, सर्व संचालकांचे आभार मानले.
सदर सभेस सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटीळक, सुरेश देठे, दिनकर कदम, राजु माने, योगेश ताड, अरुण नलवडे,परमेश्वर लामकाने, आण्णामामा शिंदे, संतोष भोसले, यशवंतराव चव्हाण पतसंस्थचे संचालक रणजीत पाटील, विलास जगदाळे, महादेव शिखरे, सुभाष कुंभार, रमेश पाटील, मल्हारी गलांडे, सभासद तात्यासो निकम, अनिल नागटिळक, दिनकर चव्हाण, महादेव देठे,नारायण शिंदे, रामचंद्र मोरे, सुदाम मोरे,अर्जुन जाधव, शंकर महाराज चव्हाण, रामचंद्र कौलगे, नारायण गायकवाड, शरद पवार, राजाराम गायकवाड, आण्णा रोडगे, ज्ञानोबा झांबरे आण्णा झांबरे, तुकाराम माने, इब्राहिम मुजावर, ज्योतीराम पोरे, अनंता घालमे, लक्ष्मण साळूंखे, बाबा करपे, पोपट घालमे, सत्यवान साळूंखे, कल्याण साळूंखे, कैलास शिर्के, युवराज साळूंखे, नवनाथ पवार, शहाजी पवार, प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थचे सर्वसंचालक, कर्मचारी, संस्थेचे सर्वसंचालक, सभासद मोठया संख्येनी उपस्थित होते.
संस्थेचे मॅनेजर सुनिल देसाई यांनी सभेचे नोटीस वाचन केले त्यास सभेने हातउंचावुन आवाजी मताने मंजुर असे संबोधुन मंजुरी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक कर्मचारी संजय जगताप केले तर उपस्थितांचे आभार संचालक व्हा.चेअरमन पांडुरंग मोरे यांनी मानले