विठ्ठलमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीन हजार कोटी रुपयांचा फायदा
अभिजीत पाटलांनी उभारली ऊसदर स्पर्धा

पंढरपूर (प्रतिनिधी)
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ऊसदराची चढाओढ लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल २६०० ते ३००० कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे गणित विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मांडले आहे. त्यांच्या या संकल्पनेचे मोठे कौतुक
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना ज्यावेळी बंद होता, त्यावेळी अनेक साखर कारखानदारांनी त्यांची कारखानदारी जगवली. शेतकऱ्यांना अत्यल्प ऊसदर देऊन साखर कारखाने उभारले. विठ्ठल कारखाना ज्यावेळी सुरू झाला, त्यावेळी अभिजीत पाटील यांनी प्रथमच शेतकऱ्यांना २५०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे घोषित केले. आणि याच वर्षापासून ऊसदराची चढाओढ सुरू झाली. शेतकऱ्यांची थकीत ४० कोटी रुपयांची ऊसबिले देऊन त्यांनी २५०० रुपयांचा ऊसदर शेतकऱ्यांना दिला. त्याच वर्षापासून जिल्ह्यात
शेतकऱ्यांना नाडणाऱ्या साखर कारखानदारीला ग्रहण लागण्यास सुरुवात झाली.