राजकिय

आ. शिंदे यांची महायुतीला मूठमाती

बबनदादांचे राजकारण अजूनही पवारांभोवती भोवती

पंढरपूर (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार हे राज्यातील राजकारणात एकामागून एक डाव टाकत आहेत.
प्रत्येक मतदारसंघात निवडून येणाऱ्या उमेदवाराची अचूक निवड करीत आहेत. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत. परंतु आगामी विधानसभा राजकारणात महायुतीतून निवडणूक लढवण्यास यांनी नकार दिला आहे. याचवेळी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार काय निर्णय घेतात, ते पाहून वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याचाही मानस त्यांनी बोलून दाखवला आहे. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना सोबत घेतल्यानंतर शरद पवार आता बबनदादांनाही सोबती बनवणार काय ?
याकडे राजकीय तज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे आ. बबनदादा शिंदे यांनी याबाबत बोलून दाखवले आहे. समर्थकांच्या आग्रहानुसार आपण राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलो होतो. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवावी असा समर्थकांचा आग्रह आहे. शरद पवार काय निर्णय घेतात ते पाहून प्रसंगी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवले आहे.

आ. बबनराव शिंदे हे कायमच राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या संपर्कात राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणे पसंत केले होते.परंतु राज्यातील राजकीय वातावरण सध्या बदलले आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्यास अनेक आमदार पाय मागे ओढू लागले आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी ही संख्या वाढणारच आहे. माढा तालुक्यातील सकारात्मक आमदार म्हणून आ. शिंदे यांची ओळख आहे. सध्या ते रणजीतसिंह शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत.नुकतीच इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर आ. बबनदादा शिंदे यांना शरद पवार जवळ करणार काय ? महायुतीचा संबंध तोडलेल्या आ. शिंदे यांना शरद पवार यांच्याकडून पुन्हा ऊर्जा मिळणार काय ? याकडे माढा तालुक्यातील शिंदे समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोणत्याही परिस्थितीत महायुतीकडून निवडणूक लढविणार नाही,अशी घोषणाच आ. बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर तालुक्यातील शेगावदुमाला येथील जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. याचवेळी शरद पवार यांच्यावर मोठी भिस्त ठेवली आहे. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? यावरच आ. शिंदे यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे वातावरण सध्या तरी दिसत आहे.

माढा तालुक्यातील आ. बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर निवडणुकीची भिस्त ठेवली आहे.साहेब काय निर्णय घेतात हे पाहून प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याचवेळी आ. शिंदे यांनी महायुतीला तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे.सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सकारात्मक वातावरण आहे. याचा फायदा आ. शिंदेंना होणार की , आणखी कोणाला ,हे शरद पवार
यांच्या राजनीतीवरच अवलंबून आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close