
पढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मध्ये भरवण्यात आलेला नोकरी महोत्सव हा राजकारणाचा भाग नसून, भैरवनाथ उद्योग समूहामार्फत कायमच असे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे आपण
उमेदवारीची मागणी केली असून, त्यास यश मिळो अथवा न मिळो , तरुणांसाठी आपण कायमच मदतीची भूमिका ठेवणार ,असा विश्वास अनिल सावंत यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गास दिला.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी, रविवारी पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून
हा महोत्सव उभारण्यात आला होता. ये महोत्सवाचे उद्घाटन पुढचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी
आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम.पाटील,
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, माजी नगरसेवक किरण घाडगे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपुरकर , एनआयआयटीचे प्रमुख श्याम गोगाव आदी मान्यवर उपस्थित होते.
या नोकरी महोत्सवात राज्यातील ५० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या महोत्सवासाठी सुमारे १००० ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. या कंपन्यांना ४५०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. यामुळे आलेल्या प्रत्येकासच नोकरी मिळण्याची संधी, या महोत्सवामुळे प्राप्त झाली. योग्य उमेदवारास जागीच नेमणुकीचे पत्र देण्याची सोय होती.
*१५ वर्षापासून झगडतोय*
या नोकरी महोत्सवाचे संयोजक भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन यांनी त्यांचीही कारकीर्द यावेळी सांगितली. मंगळवेढा तालुक्यात लवंगी येथे भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना १५ वर्षापासून चालवीत आहे. या कारखान्यासाठी मोहोळ पंढरपूर आणि जत तालुक्यातून ऊस गळपासाठी नेला जातो.
मंगळवेढा तालुक्यात आज ना उद्या सिंचन सुविधा उपलब्ध होतील, या आशेवरच हा व्यवसाय
आजही सुरूच आहे.
*विद्यार्थी आनंदले*
नोकरी महोत्सवात आलेल्या बहुतांश विद्यार्थीत रुणांना या ठिकाणी नोकरीचे नेमणूकपत्र मिळाले. या नोकरी महोत्सवाने आपल्या करिअरला सुरुवात झाल्याचा आनंद, या तरुणांच्या चेहऱ्यावर दिसत होता.