
पंढरपूर (प्रतिनिधी)
छावा क्रांतिवीर सेनेच्या शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी, पंढरपूर तालुक्यातील युवा नेते गणेश माने यांची निवड जाहीर करण्यात आली. या सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी जालना येथील दसरा मेळाव्यात ही निवड जाहीर केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेश माने यांचा सन्मान केला.
रविवारी जालना येथील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्समध्ये छावा क्रांतिवीर सेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, जि. प. सदस्य गणेश राऊत, नगरसेवक जगन्नाथ चव्हाण, प्रशांत पाटील, सतीश जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छावा क्रांतिवीर सेनेचा दसरा मेळावा जालना येथे मोठ्या उत्साहात पार पडला . या दसरा मेळाव्यास संस्थापक करण गायकर तसेच कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी युवा नेते गणेश माने यांची या सेनेच्या शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गणेश माने यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील राहील, शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठा जोम आणीन, असे उद्गार गणेश माने यांनी काढले.
या मेळाव्यास युवा उद्योजक अनिल पाटील, मराठा समन्वयक सुनील बापू आर्दड, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग, केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे, महिला प्रदेशाध्यक्ष मनोरमा पाटील, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, प्रदेश युवा सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे, कायदेशीर सल्लागार अविनाश औटे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष तथा सोलापूर प्रभारी जिल्हाप्रमुख हर्षद भोसले, अविनाश शिंदे, सांगलीचे दीपक मुळीक, सोलापूरचे महेश जाधव, यांच्यासह आशिष मुळीक, विष्णू माने, दिनेश कवडे, विठ्ठल चव्हाण, विष्णू नायकुडे, कल्याण ननवरे, भीमराव ननवरे इत्यादी मान्यवर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.