राजकिय

अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भालके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत का ? काँग्रेसने तपासून पहावं

पंढरपूरमध्ये खा. अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूरमधील मतदारांनी कोणताही संभ्रम बाळगण्याचे कारण नाही. पंढरपूर मंगळवेढ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. शरद पवार साहेब, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या तिघांपैकी कोणाची सभा घ्यायची ? याचे नियोजन सुरू आहे. पवार साहेब या मतदारसंघात सभा घेणार नाहीत, ही निव्वळ अफवा आहे. मतदारांनी यावर विश्वास ठेवू नये. तिघांपैकी कोणाचीही सभा या मतदारसंघात होऊ शकते. पंढरपूर मंगळवेढ्याची जागा पूर्ण ताकदीनिशी लढवली जात आहे. खरंतर भालके हे काँग्रेसचे उमेदवार आहेत का ? काँग्रेसने एकदा तपासून पहावे.

काँग्रेसमधून बीआरएस आणि बीआरएस मधून
आता पुन्हा काँग्रेसमध्ये असा त्यांचा प्रवास आहे. अनेक पक्षांमध्ये फिरून आलेल्या उमेदवाराला निवडणुकीमध्ये मतदारच योग्य उत्तर देतील ,असा हल्लाबोल खा. अमोल कोल्हे यांनी यावेळी केला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसचाही उमेदवार निवडणूक लढवत आहेत यामुळे लोकांमध्ये कोणतीही संभ्रमावस्था राहू नये, यासाठी खा. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती याप्रसंगी ते बोलत होते.

या पत्रकार परिषदे दरम्यान माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रताप गंगेकर, संतोष नेहतराव, समाजसेवक अर्जुन पवार, सामाजिक कार्यकर्ते आणि आरपीआय शहराध्यक्ष समाधान लोखंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गंगेकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब आसबे, राजश्री गंगेकर, संतोष नेहतराव, सुरेश नेहतराव, बाळासाहेब नेहतराव आदींसह विविध पदाधिकारी आणि दहा नगरसेवकांनी खा. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी विविध पदाधिकारी आणि दहा नगरसेवकांचे, महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांनी आभार मानले. येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण सोबत काम करू, तुमच्या येण्यामुळे पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्षेंद्र पवार पक्षाची ताकद नक्कीच वाढणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close