
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर बसस्थानकात लवकरच ३९ तर मंगळवेढा बसस्थानकात २७ इलेक्ट्रिक बसेसची हजेरी लागेल, याबाबत आ. अवताडे यांनी सोमवारी दुजोरा दिला
आणि भाविकांना पुन्हा इलेक्ट्रिक बसेसच्या प्रेमात
पाडले. तीर्थक्षेत्र पंढरपूर बसस्थानकास आ.समाधान आवताडे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे,
उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन चव्हाण,
पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वाळूजकर, एस. टी. महामंडळाचे वाहतूक निरीक्षक एन.एस. दळवे यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर बसस्थानकातील दुर्गंधी ,अस्वच्छता किरकोळ चोरीच्या घटना याबाबत प्रवाशांमधून तसेच भविकांमधून नाराजी व्यक्त होत होती. यावरून आ. आवताडे यांनी अचानक पंढरपूर बसस्थानकास भेट दिली. येथील समस्यांबाबत बसस्थानकाच्या वाहतूक
निरीक्षकांसह पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी येत्या आठ दिवसात भाविकांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक अनुभवता येईल, याची हमी दिली.
पंढरपूर बसस्थानकावर स्वच्छतेसाठी अतिरिक्त
मनुष्यबळाचा वापर करावा, भाविकांनी उघड्यावर लघवी करू नये, हे सांगण्यासाठी बसस्थानक प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा वापर करावा, चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना आ. अवताडे यांनी प्रशासनास दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी पोलीस प्रशासनाकडून अतिरिक्त ५ सीसीटिव्ही कॅमेरे बसस्थानकात बसवण्यात येणार असल्याची माहिती
दिली.
पंढरपूर बसस्थानकात इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे.
याबाबत आ. अवताडे यांनी पुन्हा दुजोरा दिला.
पंढरपूर बसस्थानकात चार्जिंग स्टेशन उभारणी
सुरू असून, लवकरच पंढरपुरात ३९ तर मंगळवेढा येथे २७ इलेक्ट्रिक बसेस हजर होतील ,असे सांगितले.
आ. अवताडे यांनी बसस्थानक प्रशासनास झापले