विद्यमान आमदारांनी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडले, सर्वसामान्य जनतेचे काय होणार ?
कोर्टी येथील सभेत अनिल सावंत यांचा घणाघात

पंढरपूर (प्रतिनिधी)
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस यांच्यामध्ये विचारांचे हेवेदावे मागेपुढे झाले असून, मतदारांचा संभ्रम होऊ नये यासाठी, पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा केला आहे. आपला विरोधक फक्त आणि फक्त भाजप पक्ष आहे, विद्यमान आमदार आहेत. गतवेळी या मतदारसंघांमध्ये गाव बैठक घेऊन प्रचार केला, आणि निवडणुकीपुरती आश्वासने दिल्याने, त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना मतदान केले. पण त्यांनी काय केले ? जेवढा निधी आणला त्याच पद्धतीचा विकास झालाय का नाही ? हे माझ्यापेक्षा लोकांना अधिक तरुण पिढीला चांगलं माहिती असल्याचे प्रतिपादन उमेदवार अनिल सावंत यांनी केले. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांची कोर्टी या गावांमध्ये प्रचार सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना सावंत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे त्यांनी पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना वा सोडले. एवढेच सांगतो की, मी तुम्हाला वाऱ्यावरती कधीही सोडणार नाही. आपले सहकारी मत मागतायत फक्त आणि फक्त वडिलांचा कृपा आशीर्वादामुळे . जनता तुम्हाला फिरकू देत आहे. जो व्यक्ती दोन तीन वर्ष, दोन दोन महिने, या मतदारसंघामध्ये ज्यांचे काम नाही, अशा व्यक्ती वरती कोण विश्वास ठेवणार ? पण आपण एक सहकारी पक्षाचे लोक आहोत, येणाऱ्या काळामध्ये त्याची मदत आपल्यालाच होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायचे काम नाही. या सर्वांचा विचार करता, नेते मंडळींनी साहेबांकडे माझी उमेदवारी मागितली असता, त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे. शेवटी या जनतेचे व भागातील लोकांचे साहेबांच्या वरती प्रेम बघता, हा विजय फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष आदरणीय पवार साहेबांचा असून, मला मतदान म्हणजे शरद पवार साहेबांना मतदान, महाविकास आघाडीला मतदान, विकासाला मतदान आहे.
त्यामुळे एक विश्वासू माणूस, एक हक्काचा माणूस म्हणून आपण मतदान करावं, आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला मतदान करा. या भागात गेली पंधरा वर्षे झालं साखर कारखाना चालवतो, माझ्यापासून मंगळवेढा व पंढरपूर या दोन्ही तालुक्यांमध्ये सर्व शेतकरी तसेच जनतेचा चांगला सहवास असून, आपले प्रश्न सोडवण्यासाठी माझे घर, पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यात साखर कारखाना, असल्याने सर्वांना कधीही मी उपलब्ध होणार आहे.
येणाऱ्या काळात मतदारसंघांमध्ये चांगले हॉस्पिटल्स, शाळा कॉलेजेस, बेरोजगारांना रोजगार, मिळण्यासाठी कंपन्या, रस्ते, शेतकऱ्यांसाठी पाणी, शहरांमध्ये असलेल्या गटारांची असुविधा, या सर्व समस्यांवरती काम करण्याची एक संधी मला द्या, त्या संधीचे सोने करून मी दाखवीन. त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मला भरघोस मतांनी निवडून द्या, व तुमचा लोकसेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन मतदारांना केले.
यावेळी कोर्टी गावातील तसेच महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.