पंढरीतील समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने सन्मानित
दिल्ली येथे पुरस्कार प्रदान

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील मुस्लिम युवक समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले यांना भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथे पार पडलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्यांना या पुरस्काराची सनद देण्यात आली. देशातून अवघ्या दहा जणांना हा पुरस्कार मिळाला असून, या पुरस्कारामुळे कमलीवाले यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा नवी दिल्ली येथील एनडीएमसी कन्वेक्शन सेंटर, संसद मार्गावर पार पडला. पद्मश्री डॉक्टर जितेंद्र सिंग षंटी यांच्या हस्ते हा पुरस्कार कमलीवाले यांना प्रदान करण्यात आला.
मुजमील कमलीवाले हे पंढरपूर शहरातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. समाजातील अनेक नागरिकांना रोजी रोटीचीही भ्रांत असते अशा गरीब लोकांचा शोध घेऊन त्यांना अन्नदान करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षापासून हाती घेतले आहे. गरीब समाजातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे. उपेक्षित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. याच समाजकार्याचा गौरव त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून होत आहे.
पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर समाजसेवक कमलीवाले यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार माझा नसून, संपूर्ण समाजाचा आहे. माझ्यासारखे काम करणाऱ्या अनेक समाजसेवकांचा आहे.
याच पुरस्काराने प्रेरणा घेऊन, समाजात अनेक तरुण, चांगल्या कामासाठी पुढे येणार आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. समाजसेवक कमलीवाले यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने, त्यांचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे.