पंढरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तरुणांचे विचारमंथन
पत्रकार संजय आवटे यांनी केले अभिजीत पाटील यांचे कौतुक

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरमध्ये साजरी करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त नाचगाणे ठरलेले. परंतु अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आलेली ही जयंती, तरुणांना विचार करण्यास भाग पाडणारी ठरली, यामुळे व्याख्याते पत्रकार संजय आवटे यांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक केले.
पंढरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सुप्रसिद्ध व्याख्याते पत्रकार संजय आवटे, आणि व्याख्याते सुरेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी झालेल्या व्याख्यानांतून, पंढरपूरकरांनी अहिल्यादेवींचा इतिहास पुरेपूर जाणून घेतला.
महापुरुषांची जयंती म्हटले की, तरुणांचा धांगडधिंगा ठरलेला, परंतु यास फाटा देत पंढरपूरमधील शिवतीर्थावर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन अभिजीत पाटील यांनी केले होते. जयंती नाचायला नाही तर विचार करायला लावणारी ठरली पाहिजे, आणि पंढरपूरमधील ही जयंती तरुणांच्या विचाराला चालना देणारी ठरली, यामुळे व्याख्याते संजय आवटे यांनी अभिजीत पाटील यांचे भरभरून कौतुक केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. हाती तलवार घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. अहिल्याबाईंनी जाती धर्मापेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिले. जल व्यवस्थापन केले. नागरिकांसाठी पाणपोई उभारल्या. त्यांच्या कर्तुत्वाचा आणि सकारात्मक विचारांचा वारसा तुम्ही आम्ही जपला पाहिजे, कारण हा देश तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा आहे, असे विचार यावेळी संजय आवटे यांनी बोलून दाखवले.
हे व्याख्यान श्रोत्यांना निश्चितच पुढील जीवनासाठी विशेष प्रेरणा देणारे आणि दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विठ्ठल प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे , माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, संतोष बंडगर, आनंद पाटील, विठ्ठल पाटील, संदीप मांडवे, पंकज देवकते, रायप्पा हळनवर, प्रशांत घोडके, रामभाऊ गायकवाड, संतोष सर्वगोड, अण्णा महाराज भुसनर, विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सिद्धेश्वर बंडगर, प्रवीण कोळेकर तसेच सोमनाथ ढोणे, नितीन काळे ,संजय लवटे, संतोष शेंडगे, बाबा येडगे, गणेश जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.