सामाजिक

पंढरीत महात्मा बसवेश्वर यांची जयंती थाटात साजरी

वीरशैव लिंगायत समाज अध्यक्ष युवराज डोंबे यांचा पुढाकार

पंढरपूर (प्रतिनिधी)

दरवर्षीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वीरशैव समाजाचे संस्थापक अध्यक्ष , महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली जाते. पंढरपूर शहरात वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी समतेचे नायक , जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करून , ही जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. पंढरपूर नगरपरिषद , मर्चंट बँक पंढरपूर याशिवाय पंढरपूर शहरात विविध ठिकाणी महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आले.

महात्मा बसवेश्वर हे वीरशैव समाजाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बाराव्या शतकात त्यांनी
समाजात न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी , मोठे काम केले होते. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर बागेवाडी गावात बसवेश्वरांचा जन्म ११३१ साली अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला. पुढे जाऊन त्यांनी वीरशैव समाजाची स्थापना केली. हिंदी कन्नड कवी ,
समाजात समता आणि न्यायासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले , म्हणूनच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात त्यांची जयंती अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साजरी केली जाते , असे प्रतिपादन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष , आणि पंढरपूर येथील मनमथ स्वामी मठाचे कार्यकारी अध्यक्ष युवराज डोंबे यांनी याप्रसंगी केले.

पंढरपूर शहरातील अर्बन बँकेसमोर झालेल्या या कार्यक्रमास , महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश भादुले, शहराध्यक्ष विशाल आर्वे,
तालुकाध्यक्ष धनंजय मेनकुदळे, सोहम भिंगे, सुरज पावले, राजकुमार जेठे, सतीश लिगाडे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, युवराज मुचलंबे, बसवराज मरले, गंगाधर स्वामी, सागर स्वामी, अक्षय डोंबे, अभिजीत कोरे, गिरीश पंतोजी पाटील, संजय खटावकर, अक्षय घोंगडे, अमित डोंबे, ओंकार बसवंती, महेश विभुते,
विश्वास ठिगळे ( काका )  गुरुराज ठिगळे , बाळासाहेब जमदाडे ( सर ), आनंद स्वामी
उमेश वायचल ,वैभव शेटे ,वैभव भांदुले ,प्रथमेश पावले भगीरथ दादा म्हमाने, यांच्यासह लिंगायत पोट जातीतील कुंभार तेली कोष्टी गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या पोट जातीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादनाच्या या कार्यक्रमास ऋतुजाताई युवराज डोंबे, माधुरीताई अमित डोंबे, आरतीताई बसवंती यांच्यासह
अनुराधा खोबरे, मनीषा ठिगळे, संजीवनी ठिगळे, रोहिणी , रेणुका म्हमाने, शुभांगी कटप, अनुराधा स्वामी, निकिता डोंबे, वंदना कोष्टी यांच्यासह भिंगे, कटप सावळजकर, शेटे, खटावकर आणि लिगाडे कुटुंबातील महिलावर्ग उपस्थित होता.

कल्याणी चालुक्य राजवंशात जन्माला आलेल्या महात्मा बसवेश्वरांना राजेशाही जीवन पटले नाही. समाजातील वाढते व्यक्तिस्तोम थोपवण्यासाठी त्यांनी शूद्र आणि अतिशूद्रांना एकत्र केले. समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठीवी रशैव समाजाची स्थापना केली. यामध्ये इतर समाजातील लोकांनीही प्रवेश केला. अशा या महात्मा बसवेश्वरांची जयंती ,पंढरीत मोठ्या थाटात साजरी झाला. इतर समाजातील बांधवांनीही त्यांना अभिवादन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close