
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ३२ ग्रामपंचायतींना, नवीन ग्रामपंचायत कार्यालये
मंजूर झाली असल्याची माहिती, आ. समाधान आवताडे यांच्याकडून देण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींना आता त्यांच्या हक्काचे कार्यालय प्राप्त होणार आहे.
राज्य शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेतून ही बांधकामे मंजूर करण्यात आली असून, या बांधकामांमध्ये शासन ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणणार आहे. नैसर्गिक प्रकाश योजना व वायू विज्ञान तसेच ऊर्जेचा काटकसरीने वापर, पर्जन्य जल पुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य आणि साधन सामग्रीचा त्यामध्ये वापर करण्यात येणार आहे. निविदा निघाल्यापासून एक वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण होईल, याचे नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम खात्याकडे देण्यात आली आहे. दर तीन महिन्याला या बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल शासन घेणार असल्याची, माहितीही आ.समाधान आवताडे यांच्याकडून देण्यात आली आहे.