
मुंबई (प्रतिनिधी)
मध्यप्रदेश मधील भारतीय
जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी, मोनू कल्याणे
याची चिमणबाग येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. मोनू कल्याणे हा भाजपाचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय होते. मोनूचे मित्र पियुष आणि अर्जुन नावाच्या दोन मित्रांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती.
कल्याणेवर गोळ्या झाडून हे दोन मित्र फरार झाले होते. यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली होती. परंतु हे दोन्ही फरार झाल्याचे समजले होते. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी मंडीदीप येथून अटक केली आहे. सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
पियुष पथरोड आणि अर्जुन पथरोड यांनी रविवारी पहाटे मोनू कल्याणेवर गोळ्या झाडल्या. आणि ज्या मोटरसायकलवर ते आले होते, त्याच मोटरसायकल वरून प्रवास करून त्यांनी मंडीदीप येथील नातेवाईकाच्या घराचा आसरा घेतला. पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन काढून, सोमवारी सकाळी
मंडीदीप येथे त्यांना अटक केली.
या दोघांच्याही हाताला जखमा झाल्या असून,
गोळ्या झाडून पोलिसांच्या भीतीने पळताना, घाई गडबडीत त्यांना या जखमा झाल्या असल्याचे
पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मोनू कल्याणे
याच्या हत्येमागे राजकीय कटकारस्थान असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे दोन्ही आरोपी कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात होते, याचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांना एका भाजपा नेत्यावर संशय आहे, परंतु त्यांनी या नेत्याचे नाव घेण्याचे टाळले. या दोघांकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे. हे पिस्तूल त्यांच्याकडे कुठून आले, याचाही शोध पोलीस घेत आहेत.