पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी येथील उद्घाटनपर कार्यक्रमाचे आमंत्रण राष्ट्रवादीप्रमुख शरद पवार यांना देण्यात आले. मंगळवार दि. ९ जुलै रोजी, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांचा श्रींचे उपरणे आणि दिनदर्शिका देऊन शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि कॉलेजचे ते चेअरमन आहेत. यामुळेच या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका घेऊन, त्यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी या शाळेतील शिक्षक वृंद एन. एम. गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक रोकडे, ग्रंथपाल उत्तम शिंदे हेही उपस्थित होते.