या अप्रतिम कलाकृतीचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा – प्राजक्ता गायकवाड
गुगल आई हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पंढरपूर (प्रतिनिधी)
जीवनातील कोणताही प्रसंग असो, त्याचे उत्तर गुगलमध्ये शोधण्याचा प्रयत्न सध्याच्या पिढीत होताना दिसतो . कुटुंबातील एक लहान मुलगी, एका पत्नीच्या पतीवर आलेले संकट, यातून मार्ग काढण्याची कुटुंबाची पद्धत. महाराष्ट्रात सुरू झालेले हे कथानक अखेर हैदराबादमध्ये जाऊन संपते. एक लव स्टोरी आणि कौटुंबिक चित्रपट याचा परिपूर्ण मिलाप गुगल आई या मराठी सिनेमात झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पहावा, असे आवाहन मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केले आहे.
मंगळवारी या चित्रपटाचा प्रोमो पंढरीत झाला. याप्रसंगी त्यांनी पत्रकार परिषदतही घेतली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत , राणी येसूबाईची धीरगंभीर व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. या व्यक्तिरेखेने त्यांना मोठा नावलौकिक मिळवून दिला. यानंतर त्यांनी मराठी सिनेमात पदार्पण केले आहे. त्यांचा पहिलाच सिनेमा गुगल आई येत्या २६ जुलै रोजी, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. याचवेळी हा सिनेमा अमेरिकेसह इतर देशातही प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
या गुगल आई मराठी सिनेमाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मन रंगलं रंगलं या गीताच शूटिंग केरळमध्ये झालं असून, सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवर ते ठिकाण होतं. प्रेक्षकांना खीळवून ठेवणारे ते ठिकाण असून, हे गीत पाहताना प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल. याशिवाय या चित्रपटाचे कथानक कौटुंबिक असल्याने, प्रेक्षकांना ते नक्कीच भावेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले