
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपुरातील प्राथमिक शाळेची दिंडी निघाली. या दिंडीत मात्र स्वतः विठ्ठल रुक्मिणी माता
आणि त्यांचा संत परिवार सहभागी झाला. पंढरपूरकरांना सध्या आषाढीचे वेध लागले आहेत. त्यातच ही दिंडी पंढरपुरात घुसली, आणि पंढरपूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आठ दिवस अगोदर, पंढरपूरमधील आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची, दिंडी निघाली. सोमवारी सकाळीच या दिंडीने सर्वांच्या नजरा वळवून घेतल्या. दिंडीत स्वतः विठ्ठल रुक्मिणी माता हजर होत्या. याशिवाय त्यांच्यासोबत अनेक संत मंडळीही सहभागी झाली होती. श्रींच्या आणि संत मंडळींच्या वेशातील ही लहान मुले, सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. हाती टाळ, पताका घेऊन मोठ्या उत्साहात ही दिंडी पंढरपुरातून चालत होती. या दिंडीचे पंढरपुरातील नागरिकांकडून कौतुक होतं होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अथक परिश्रम घेऊन, दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे शिक्षक सौ. रजनी देशपांडे, सौ आशा पाटील, सौ अन्नपूर्णा धायगुडे, सौ सुवर्णा सपकाळ आदी शिक्षकांनी या दिंडीसाठी परिश्रम घेतले होते .दिंडीसाठी विद्यार्थ्यांना
मदत करणाऱ्या पालकांचेही शिक्षक वर्गाकडून आभार मानण्यात आले.