
पंढरपूर (प्रतिनिधी)
आढीव येथे डॉ. शितल शहा यांनी जैन धर्मियांचे भव्य दिव्य मंदिर उभा केले आहे. या मंदिरात तीर्थंकर विसुब्रतनाथ यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जैन मुनी विशुद्ध सागरजी महाराज त्यांच्यासह ३० मुनींना घेऊन , शनिवारी पंढरीत दाखल झाले. पंढरपूर शहरातील जैन बांधवांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली. त्यांच्या उपस्थितीत आढीव येथे
पंचकल्याण प्रतिष्ठा सोहळा , संपन्न होणार आहे. पंढरपूरकरांच्या दृष्टीने हा मोठा अनुभव पंढरपूरकरांना मिळणार आहे.
जैन समाजातील अध्यात्म गुरु १००८ , विशुद्धसागरजी महाराज यांची मिरवणूक , येथील कवठेकर विद्यालया जवळील , जैन मंदिरात विसर्जित झाली. या ठिकाणी विशुद्धसागरजी महाराज यांनी रसाळ प्रवचन केले. यानंतर त्यांनी , आढीव येथील तपोवनाकडे मार्गक्रमण केले. सुमारे ३० जैन मुनींच्या ताफ्याचे दर्शन घेण्यासाठी , पंढरपूरकरांनी ठीक ठिकाणी गर्दी केली होती.
आढीव येथील तपोवनासमोर मुनिंच्या संघाचे स्वागत करण्यासाठी डॉ. शितल शहा आणि इतर जैन महानुभावांनी सपत्नीक हजेरी लावली होती.
ढोल ताशे , बँड पथक यांच्या गजरात जैन मुनींचे मनोभावे स्वागत करण्यात आले.
आढीव येथील तपोवन या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. या महोत्सवासाठी देशभरातून जैन बांधव येणार असल्याने , त्यांच्या मुक्काम, खाणे पिणे , स्वच्छतागृहे , परिसरात जाण्या येण्यासाठी रिक्षांची सोय करण्यात आली आहे. मंदिराशेजारी जैन सार ग्रहण करण्यासाठी आलिशान
शामियाना उभारण्यात आला असून , यामुळे हा परिसर गजबजुन गेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी मोठ्या थाटात झाली. विशुद्ध सागरजी महाराज आणि त्यांच्यासह आलेल्या मुनींनी धर्म ध्वजारोहण करून , या महोत्सवास प्रारंभ केला. या कार्यक्रमास डॉ. शितल शहा सपत्नीक उपस्थित होते.