
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील अनिल नगर येथे हळदी कुंकवाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती , कार्यक्रमाच्या आयोजिका , सौ. अंजलीताई अक्षय गंगेकर , सौ. नेहाताई अभिषेक गंगेकर आणि सौ. हेमाताई गणेश सोमवंशी यांनी दिली आहे.
रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , या समारंभास पंढरपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, आमदार पत्नी तृप्तीताई राजू खरे , सुमित्राताई अभिजीत पाटील, शैलाताई अनिल सावंत, माजी नगराध्यक्षा राजश्रीताई प्रताप गंगेकर , नगरसेविका रंजनाताई शंकर पवार, भारतीताई नागेश गंगेकर, समाजसेविका लक्ष्मीताई बाबुराव गंगेकर या मान्यवर भगिनींची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील अनिलनगर येथील भगवती मंदिर येथे हा समारंभ होणार असून , या कार्यक्रमात महिलांना विरंगुळा देणारे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या कार्यक्रमास पंढरपूर शहरातील महिलांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गंगेकर परिवाराकडून करण्यात आले आहे.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम निवडणूक जाहीर होण्याअगोदरच सुरू झाली असून , शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबू लागले आहेत. अनिलनगर येथूनच या उपक्रमांना सुरुवात झाली असून , गंगेकर परिवाराने महिन्यात सलग दुसरा कार्यक्रम घेऊन, धुरळा उडवून दिला आहे.