पंढरीतील समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी व्यक्त केला मोदींवर विश्वास
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विजयाचे मांडले गणित

पंढरीतील समाजसेवक आणि पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान अवताडे यांचे निष्ठावंत संजय बाबा ननवरे यांनी,
पंढरपूर मधील प्रभाग क्रमांक चार मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करीत, आ. राम सातपुते
यांच्या विजयाचे गणित पक्के मांडले.
पंढरीतील समाजसेवक संजय बाबा ननवरे हे व्यक्तिमत्व मागील काही वर्षापासून प्रसिद्ध झाले आहे. पंढरीतील उपेक्षितांना तसेच गरजूंना मदत करण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात. यामुळे त्यांचे नाव पंढरपूर शहरात झपाट्याने पसरले.
भाजपाचे आमदार समाधान अवताडे यांचे ते निष्ठावंत अनुयायी आहेत. देशाचा राजा निवडायची वेळ आहे. देशाचा राजा कणखर असावा, मग कोणतीच धास्ती नसते. असे सांगत त्यांनी पंढरपूर मधील प्रभाग क्रमांक चार मध्ये आपल्या मतदानाचा बजावला. प्रभाग क्रमांक चार मध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या प्रभागावर त्यांची बारीक नजर होती. प्रभाग क्रमांक चार मधून मोदीजींच्या नेतृत्वावर मोठा विश्वास नागरिकांनी ठेवला आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आ. राम सातपुते हे एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.