करकंब होळे पंढरपूर अर्धवट रस्त्याचे काम अखेर सुरू !
काँग्रेस तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

पंढरपूर (प्रतिनिधी)
सरकारी काम अन सहा महिने थांब ! अशी म्हण , प्रशासकीय कामाबाबत रुढ झाली आहे . परंतु कोणातरी समाजसेवकाने अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने रेटा देताच, प्रशासन सरळ वागू लागते. याचा प्रत्यय बुधवारी पाहण्यास मिळाला. करकंब होळे पंढरपूर हा रस्ता रानमळा येथे अपूर्ण अवस्थेत होता. याबाबत नागरिकांनी तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडे तक्रारी घातल्या होत्या. हनुमंत मोरे यांनी मागील आठवड्यात , प्रशासनाला निवेदन देत याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता. पाच ते सहा दिवसातच प्रशासनाने नांगी टाकली , आणि हे अर्धवट काम सुरू झाले. हे काम सुरू झाल्यामुळे भोसे परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
करकंब होळे पंढरपूर हा रस्ता मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून बनवण्यात आला होता. तालुक्यातीलच एका कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम केले होते. हे काम करकंबजवळ आणि भोसे परिसरातील रानमळा येथे अपूर्ण अवस्थेत होते. रस्त्यावर पडलेल्या खडीच्या ढिगार्यांमुळे येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत होता. याबाबतची तक्रार येथील नागरिकांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडे केली होती. याबाबत हनुमंत मोरे यांनी मागील आठवड्यात , प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर पाच ते सहा दिवसातच या कामास सुरुवात झाली आहे. हे काम सुरू केल्याबद्दल , बांधकाम प्रशासनाचे आणि तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांचे येथील नागरिकांकडून स्वागत होत आहे.