
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा आणि माढा तालुक्यातील जनता
मला भावी आमदार असे संबोधते. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेला मला आमदार रूपात पहावयाचे आहे. त्यांच्या स्वप्नाला आता मी मूर्त आकार देणार आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत माढा अथवा मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवून, कोणत्याही परिस्थितीत आमदार होणारच असा हुंकार अभिजीत पाटील यांनी भरला आहे.
अभिजीत पाटील यांची राजकीय घोडदौड अल्प कालावधीत मोठी नाट्यपूर्ण झाली आहे. जेवढी संकटे त्यांच्या वाट्याला आली, तीतकीच लोकप्रियता त्यांना मिळत गेली. थोड्याच कालावधीत लोकप्रियतेचा कळस त्यांनी गाठला. आतापं ढरपूर मंगळवेढा आणि माढा विधानसभा मतदार संघावर त्यांनी हक्क सांगणे सुरू केले आहे. नव्हे तर येथील नागरिकच त्यांना आमदार होण्याची जाणीव करून देऊ लागले आहेत.
एक ऑगस्ट हा त्यांचा वाढदिवस. हा वाढदिवस सकाळपासूनच गाजू लागला. सकाळी नऊ वाजता त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर नामदेव पायरी येथे त्यांनी महाआरती केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.