
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरचे सुप्रसिद्ध युवक समाजसेवक मुजमील कमलीवाले यांना श्रीलंकेत सन्मानित करण्यात येणार असून , ३१ जानेवारी रोजी त्यांना याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारे ते पंढरीतील पहिलेच युवक असून , त्यांच्या या कामगिरीचे पंढरपूरकरांकडून कौतुक होऊ लागले आहे.
यंदाचा आंतरराष्ट्रीय ग्लोबल आयकॉन पुरस्कार , समाजसेवक मुजमिल कमलीवाले यांना जाहीर झाला असून , त्यांच्यासह भारतातील विविध क्षेत्रातील एकूण ३० मान्यवरांचाही यात समावेश आहे. श्रीलंकेतील कोलंबो शहरांमधील बंडारनाइके मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉल हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दि.३१
जानेवारी रोजी पार पडणार आहे.या सोहळ्यासाठी विविध देशातील अनेक मंत्रीगण , प्रसिद्ध अभिनेते आणि उद्योगपतींची उपस्थिती राहणार आहे.
मुजमिल कमलीवाले हे पंढरपूर शहरातील मेडिकल व्यावसायिक असून , समाजसेवा क्षेत्रात त्यांचे नाव आघाडीवर आहे. गोरगरिबांना अन्नदान, उपेक्षित घटकांना मदत, उपेक्षित वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहामध्ये त्यांनी आजवर केलेले काम , हे वाखाण्यासारखे आहे. उपेक्षित समाजातील बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळेच त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे , त्यांची जबाबदारी आणखी वाढल्याचे दिसत आहे.