राजकिय

लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट

राहुल गांधींकडून काँग्रेसच्या पाच घोषणा

पंढरपूर (प्रतिनिधी)

राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे होत असून, महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना ३००० रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी केलेल्या २१०० रुपयांपेक्षा ९०० रुपये जास्त रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं, महाविकास आघाडीने जाहीर केले आहे.

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना मोफत बसप्रवास देण्याची घोषणा, या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. लोकसेवेची पंचसुत्री म्हणत महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरुन आज विधानसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय.

महाविकास आघाडीच्या ५ प्रमुख घोषणा

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये, तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास. शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ, तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत.

नाना पटोले यांचा फडणवीसांवर पलटवार

आज आम्ही दिक्षाभुमीवर गेलो होतो, बाबासाहेब यांच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, ⁠तो हात आम्ही लावू देणार नाही. समतेची लढाई दिक्षाभूमीवर सुरू केली, ⁠राहूल गांधी जे संविधान दाखवतात, त्या लाल रंगावरुन फडणवीस यांनी नक्षलवादी म्हटल, ⁠मात्र आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो, असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर संविधानाच्या मुद्द्यावरुन पलटवार केलाय.

वर्षा गायकवाड यांनी वेधलं धारावी प्रकल्पाकडे लक्ष*

राहुल गांधी यांना मी विनंती करते की, त्यांनी मुंबईच्या लढ्यात सहभागी झालं पाहिजे, ⁠मुंबईच्या जमीन विकल्या जात आहेत. ⁠मुंबईची लूट केली जात आहे, ⁠धारावीला लुटायचं काम सुरू आहे. प्रत्येकाच्या घराची लढाई सुरु आहे, ⁠राहूल गांधी तुम्हाला यासाठी यावं लागेल, ⁠तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आणि लढाई लढावी लागेल, असे म्हणत खा. वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींने मुंबईतील धारावी पुनर्वसन विकास प्रकल्पाकडे लक्ष वेधले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close