केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मुजमील कमलीवाले
राज्य अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी केली घोषणा

पंढरपूर (प्रतिनिधी)
केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा
उपाध्यक्षपदी, पंढरपूरमधील समाजसेवक मुजम्मिल कमलीवाले यांची नुकतीच निवड करण्यात आली.आणि समाजातील वंचित, दीन दलितांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांच्यावर येऊन ठेपले. निवडीनंतर कमलीवाले यांचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला.
दिल्ली येथील केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा नुकताच विस्तार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये या संघटनेचे कार्य वाढविणे तसेच दीनदलीत, पीडित व संकटात सापडलेल्या नागरिकांना योग्य तो न्याय देण्याच्या उद्देशाने, पंढरपूर शहरातील मुजम्मिल कमलीवाले यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
.समाजात दररोजच गोरगरिबांवर अन्याय होत असतात. याचप्रमाणे महिलांवर अत्याचार, लैंगिक शोषण तसेच मानवी हक्काचे उल्लंघन करणाऱ्या असंख्य गोष्टी होत असतात. या सर्व पिडिताना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मानवाधिकार संघटना ही कार्य करत आहे. मानवी हिताच्या रक्षणासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटना स्थापन झाली असून, याचे कार्य व माहिती संपूर्ण राज्यात सर्वसामान्य जनतेला होणे गरजेचे असल्याचे मत या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मानवाधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. कुमार लोंढे यांनी पंढरपूरमध्ये येऊन या संघटनेच्या नूतन निवडी जाहीर केल्या. यावेळी कमलीवाले यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस , मंगळवेढा, पंढरपूर, सोलापूर तसेच इतर ठिकाणाचे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.