
यूजीसी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे,
लातूरपर्यंत पोहोचले असून, येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील पहिला आरोपी जलील उमरखा पठाण यास न्यायालयाने दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यातील दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव यास न्यायालयापुढे हजर केले असता, त्यासही दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी संजय जाधव यास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर हा आरोपी फरार झाला होता. त्यास सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अटक करण्यात आली.हा सोलापूर जिल्ह्यातील टाकळी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे.
आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात
दाखल केले असून, यामध्ये जलील उमरखा पठाण, संजय तुकाराम जाधव, इरण्णा मशमाजी कोंगलवार, आयटीआय शिक्षक उमरगा आणि गंगाधर मुढे रा. दिल्ली अशी या आरोपींची नावे आहेत. अजून दोन संशयित आरोपींवर पोलिसांचा संशय असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
जलील पठाण हा कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून, नुकतीच त्याची पदोन्नती झाली आहे. याप्रकरणी त्याने खोटे डॉक्युमेंट्स शासनाला पुरवले असल्याची माहिती हाती आली आहे.