राज्यात नीट पेपर लीक झाल्याच्या प्रकरणामुळे
मोठा गोंधळ उडाला आहे.या प्रकरणी पोलिसांना मोठे धागेदोरे लागले असून, आतापर्यंत सहा आरोपींचा शोध लागला आहे.
या पेपर फुटीसंदर्भात बिहारचा विद्यार्थी अनुराग यादव यांने पोलिसांसमोर जवाब देऊन, पेपर फुटल्याचा मोठा खुलासा केला होता. या प्रकरणी आता लातूरच्या दोन जणांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
याप्रकरणी बिहारमधील अनुराग यादव या विद्यार्थ्यांने पोलिसांना कबुली जवाब दिला आहे. समस्तीपुरचा रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्यांने आपल्या जबाबात पेपर फुटल्याचे सांगितले आहे.याप्रकरणी तो म्हणाला की, मी कोटा येथील ॲलान कोचिंग सेंटरमध्ये नीट परीक्षेचा सराव करत होतो. माझे काका सिकंदर प्रसाद यादव हे नगरपरिषद दानापूर येथे कनिष्ठ अभियंता आहेत. नीट परीक्षेची सेटिंग झाली, असे सांगून त्यांनी मला कोटावरून परत येण्यास सांगितले. यावर मी परत आलो. चार मेच्या रात्री काकांनी मला अमित आनंद आणि नितेश कुमार यांच्यासोबत सोडले. तिथे मला नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आली. हे प्रश्न नीट ध्यानात घेण्यास सांगण्यात आले. माझे नीट परीक्षा केंद्र डी. वाय. पाटील स्कूल होते. परीक्षा द्यायला गेल्यावर, जी प्रश्नपत्रिका माझ्या लक्षात ठेवली होती, तेच सगळे प्रश्न परीक्षेत बरोबर आले होते. परीक्षा संपल्यानंतर अचानक पोलीस आले, आणि मला पकडले. मी माझा गुन्हा मान्य करतो.
असा कबुली जवाब बिहारमधील विद्यार्थी आनंद यादव याने दिला आणि पोलिसांची चक्रे गरगर फिरू लागली.