
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात यूजीसी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. याप्रकरणीला लातूरचे मुख्याध्यापक जलील पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीमु ख्याध्यापक जलील पठाण यांना निलंबित केले आहे. यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नीट पेपर फुटीचे लोन बघता बघता लातूरपर्यंत येऊन पोहोचले. नांदेडच्या एसआयटी पथकाने लातूर मधील दोन शिक्षकांना अटक केली. यामध्ये कातपूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जलील उमरखा पठाण यांचा समावेश होता. आतापर्यंत ७०० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
लातूर येथे राज्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. लातूर पॅटर्न याबाबत प्रसिद्ध आहे. याचाच फायदा उचलून, जलील पठाण आणि त्यांचा सहकारी शिक्षक संजय जाधव हे पेपर फोडण्याचा व्यवसाय करत होते. पेपर फुटी प्रकरणात आरोपी होताच, जलील पठाण यांचे निलंबन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. जलील पठाण यांनी जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन केली आहे ,असा ठपका त्यांच्यावर ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.