ईतर
बनावट कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान

पंढरपूर (प्रतिनिधी)
बनावट कीटकनाशक तयार करून , शेतकऱ्यांना विकणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, राज्याच्या कृषी संचालकांनी दिले आहेत. यामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव आणि अनवली येथील फळबागा कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे जळाल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी शेतकऱ्यांनी या कंपनी विरोधात तक्रारी केल्या होत्या. यावर कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणी दरम्यान कीटकनाशकामध्ये तणनाशक असल्याचे आढळून आले. यामुळे कंपनीत बनावट कीटकनाशक बनवण्यात येत असल्याचे दिसून आले होते. परंतु या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता.