राजकियसामाजिक

माझा फोकस फिक्स -अभिजीत पाटील

घे भरारी कार्यक्रमात अभिजीत पाटलांच्या भरारीची चर्चा

पंढरपूर (प्रतिनिधी)

मागील काही वर्षापासून पंढरपूरसह जिल्ह्याच्या राजकारणात तसेच सहकारात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिजीत पाटील यांच्या भरारीची चर्चा, पंढरपूरमधील त्यांनीच आयोजित केलेल्या घे भरारी कार्यक्रमात दिसून आली.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घे भरारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसिद्ध व्याख्याते कांगुणे सर यांनी अस्सल गावरानी भाषेत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःशी स्पर्धा करावी, ध्येय फिक्स करून ते गाठण्याचा प्रयत्न करावा, असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी या कार्यक्रमात बोलताना अभिजीत पाटील यांनी माझा फोकस फिक्स आहे. काय करायचं आणि कुठे जायचं, हे मी मागेच ठरवलं आहे. अभिजीत पाटील यांच्या जीवनपटाचा चित्रपटच या त्यांच्या वाक्याने उपस्थित नागरिकांच्या डोळ्यासमोर
तरळला. अभिजीत पाटील यांचा राजकीय जीवनपट अनेक चढउतारांनी भरलेला आहे. हा जीवनपट अगदी वेगवान असून, प्रत्येक कठीण प्रसंगावर त्यांनी आजवर मात केली आहे. प्रसिद्ध व्याख्याते कांगुने सर यांनी
यांच्या मार्गदर्शनाबरोबरच अभिजीत पाटील यांचा जीवनपटही उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.

पंढरपूरमधील पोलीस संकुलातील रुक्मिणी सभागृहात हे व्याख्यान मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी डॉ. बीपी रोंगे सर, सुभाषराव माने, उत्तमराव कोकरे, पी.जे. सावंत, कालिदास कवडे, सिकंदर ढवळे, प्रमोद पाठक, रजनीताई जाधव, मुंडे मॅडम, कैलास करांडे, औदुंबर गायकवाड, जे.बी. गायकवाड, पिसे सर, प्रशांत पाटील, गणपत मोरे, व्ही.एम. कुलकर्णी, डी. वाय. पाटील, कोंडलकर सर, महादेव लवटे, वही.एस. शेळके, गाजरे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close