
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जोरदार बाजी मारली. ४८ पैकी ३० जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी
आघाडी धर्म नेटाने पाळला. म्हणूनच महाविकास आघाडीला राज्यात मोठे यश मिळाले.
माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली.महाविकास आघाडीच्या
रेट्यामुळे त्यांचा दणदणीत विजय झाला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनीही निवडणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ऋण व्यक्त करण्यासाठी, खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुंबईत जाऊन मातोश्री गाठली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. निवडणुकीत शिवसेनेकडून झालेल्या मदतीविषयी आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे, तालुकाप्रमुख संतोष राऊत, बंडू घोडके, सूर्यकांत घाडगे, कमरूद्दिन खतीब, रणजीत कदम, युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश इंगळे, ऋषिकेश कवडे, तुषार इंगळे, अरविंद पाटील, संदीप कदम, महादेव बंडगर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.