
पंढरपूर (प्रतिनिधी)श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्यावरून , मंदिरातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु या प्रकरणातील दोषी पदाधिकाऱ्याने कर्मचाऱ्याची माफी मागितली, आणि हे आंदोलन जागेवर थांबले. ही घटना गुरुवारी घडली.भा
रतात दया हा मोठा धर्म मानला जातो. मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी मंदिरातील रोपळकर नावाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली होती. यावरून मंदिरातील कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी राग होता.मंदिर समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना निवेदन देऊन, मंदिरातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले होते.