
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मधील नगरपरिषदेच्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या वाहनतळावर, शहर सुशोभिकरण अंतर्गत तुळशी वृंदावन व संतांच्या मूर्ती उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यास येथील दुकानदारांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आ. समाधान आवताडे यांना निवेदन देण्यात आले.
पंढरपूर नगरपरिषदेचे शहरातील पहिले शॉपिंग सेंटर म्हणून इंद्रप्रस्थची ओळख आहे. चाळीस वर्षाहून जुन्या असणाऱ्या या शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांसाठी, व येणाऱ्या ग्राहकांसाठी वीर सावरकर पुतळ्याच्या पिछाडीस वाहनतळ देखील आहे. मात्र सदर जागेवर उंच तुळशी वृंदावन, संतांचे पुतळे उभा करण्याचा अचानक निर्णय प्रशासनाने घेतला. विशेष म्हणजे यास तातडीने मंजुरी देखील देण्यात आली आहे.
यामुळे येथील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.