सामाजिक
भाविकांसाठी राबती पंढरपूरकरांचे हात
करंडे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून तीन दिवस अन्नदान

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूरची आषाढी यात्रा म्हटले की, पुण्यापासून पंढरपूरपर्यंत अन्नदानाचा झपाटा लागलेला दिसतो.
पंढरीत पायी चालत येणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा देण्याचे काम पंढरपुरातील करंडे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सोमवारी
त्यांच्याकडून अन्नदानाला सुरुवात झाली. आता तीन दिवस या ठिकाणी अनेकांचे हात दिवसरात्र राबणार आहेत.
पंढरीतील उद्योजक मीनाक्षीताई करंडे, त्यांचे सहकारी शिवाजी उर्फ बंडू भोसले आणि युवराज क्षीरसागर यांच्या वतीने येथील सरगम चौक येथे, दरवर्षीच भाविकांसाठी मोफत भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गेल्या तीन वर्षापासून त्यांनी या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दरवर्षी या ठिकाणी तीन लाख भाविक भोजनाचा आस्वाद घेतात, अशी माहिती मीनाक्षीताई करंडे यांनी दिली आहे.