सामाजिक

आषाढी यात्रेतील रक्षकांना दिला मदतीचा हात

समाजसेवक मुझमिल कमलीवाले यांचा स्तुत्य उपक्रम

आषाढी यात्रेतील
पोलीस बांधवांना समाजसेवक कमलीवाले यांची मदत

पंढरपूर (प्रतिनिधी)

आषाढी यात्रेत पंढरपूरमध्ये सुमारे १५ लाख भाविक हजेरी लावतात.या भाविकांसाठी पुण्यापासून पंढरपूरपर्यंत अनेक दानशूर मदतीचा हात देतात. परंतु आषाढी यात्रा सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस बांधव ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून राबत असतात, त्यांच्याकडे सर्वच नागरिकांचे दुर्लक्ष असते. या पोलीस बांधवांना मदतीचा हात देण्याचे काम, पंढरीतील समाजसेवक मुझमिल कमलीवाले यांनी केले आहे. त्यांच्या या मदतीचे समाज बांधवांकडून मोठे कौतुक होत आहे.

विठुरायाचा भक्त वारकरी मोठा श्रद्धाळू. या वारकरी
संप्रदायाचे लाड मोठ्या जिद्दीने पुरविले जातात. त्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन जीवाचा आटापिटा करते. यातील एक भाग म्हणजे पोलीस प्रशासन. दिवस रात्र या घटकाकडे कुणाचेही लक्ष नसते. समाजसेवक मुजम्मिल कमलिवाले हे नेहमीच उपेक्षित घटकांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणूनच त्यांनी आपल्या मदतीचा मोर्चा पोलीस बांधवांकडे वळवला. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना २००० मास्क, १५०० एनर्जी पावडर, इमर्जन्सी औषधे आणि इतर औषधांचे वाटप केले. कमलीवाले यांच्या या मदतीमुळे, पोलीस बांधव भारावून गेले. कमलीवाले यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचे पोलीस बांधवांकडून मोठे कौतुक करण्यात आले.

*आषाढी यात्रेत पोलीस बांधव उपेक्षितच* 

सबंध आषाढी यात्रेत सर्वांचे लक्ष येथे येणाऱ्या भाविक भक्तांकडे असते.या भाविकांची सेवा करण्यासाठी, पोलीस बांधव दिवसरात्र झटत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नसते.भाविकांना सुरक्षा पुरवणाराच , दुर्लक्षित राहतो. या गोष्टीचे अचूक निदान पंढरीतील समाजसेवक मुझमिल कमलीवाले यांनी केले आहे. उपेक्षित घटकांना शोधण्याची त्यांची नजर किती तीक्ष्ण आहे, याचा प्रत्यय यंदाच्या आषाढी यात्रेत आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close