
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यात मराठा आरक्षणाचा राज्यात तापला असताना, पंढरपूर मंगळवेढ्याचे आ. समाधान अवताडे यांनी, हिवाळी अधिवेशनात पंढरपूरमधील मराठा भवनाचा प्रश्न उपस्थित केला. यामुळेच पंढरपूरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी, पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता हे मराठा भवन बांधण्यासाठी पंढरपूरमध्ये गजानन मठामागील जागा देण्याचे निर्देश करा, अशी मागणी आ. समाधान अवताडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठा भवनास मंजुरी मिळताच, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील मराठा समाज आनंदित झाला. पाच कोटी रुपयांचा निधी या भावनासाठी मंजूर झाला.
आता या इमारतीच्या बांधकामासाठी पंढरपूर शहरातील गजानन मठामागील म्हसोबा देवस्थान लगतची जागा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गजानन मठामागील ही जागा म्हसोबा देवस्थान
साईट ग. नं. ४५ ही असून, याचे क्षेत्रफळ
६४ आर इतके आहे. पंढरपूर नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना मुख्यमंत्री यांनी याबाबतचे निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. समाधान अवताडे यांनी केली आहे.