
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरीतील विठुरायाच्या आषाढी यात्रेसाठी राज्य शासनाने मुबलक निधी दिला आहे. या निधीची पुरती लयलूट करण्याचा धंदा, पंढरपूर नगरपरिषदेने चालविला आहे. रस्त्याच्या कडेला शौचालयांची खोकी मांडून, भाविकांची व्यवस्था केली असल्याचे दाखवण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र
पंढरी नगरीत या शौचालयांची दयनीय अवस्था असल्याचे चित्र आहे.
पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी, तात्पुरती शौचालये उभी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. प्रत्येकच आषाढी यात्रेत ही शौचालये उभारली जातात. ही शौचालये उभारण्याचा ठेका, एका खाजगी कंपनीकडे देण्यात आला आहे. ही खाजगी कंपनी पालखी मार्गावर पालख्यांबरोबर, ही शौचालये पंढरपूर शहरापर्यंत आणत असते. शेवटच्या दोन दिवसात ही शौचालये पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कडेला उभी केली जातात. परंतु या शौचालयांचा वापर होतच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
पंढरपूर शहरात चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर परिसर, मंगळवेढा रोड, सांगोला रोड, प्रदक्षिणा मार्ग, रेल्वे बसस्थानक मार्ग, यासह विविध ठिकाणी ही शौचालये उभी करण्यात आली आहेत. या शौचालयाचा वापर होण्यासाठी, पाण्याची सोय, शौचालयाच्या शेजारी बॅरल ठेवून करण्यात आली आहे. परंतु हे बॅरल रिकामेच असल्यामुळे,
भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. कमी पाण्याच्या पुरवठ्यामुळे एका शौचालयाचा वापर एकदाच होत असल्यामुळे, ही शौचालये तात्काळ बंद पडत आहेत. परिणामी भाविकांना त्यामध्ये जाणे गैरसोयीचे होत आहे. अशी ही हजारो शौचालये पंढरपूर शहरात मांडली गेली आहेत. शौचालय शहरात मांडून, आरोग्य विभागाने शासनाचा निधी लुटण्याचा खेळच मांडल्याचे दिसून येत आहे.
*शौचालयांची अवस्था पाहून भाविकांची होतेय निराशा*
भाविकांना रस्त्याच्या कडेला उभी शौचालये पाहून, प्रथमदर्शनी आनंद होतो. परंतु शौचालयाची अवस्था पाहिल्यावर, त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. निराश झालेला भाविक शौचालयजवळून माघारी फिरतो. परंतु पंढरीत उभारण्यात आलेली कायमस्वरूपीची सुलभ शौचालये त्यांची गरज पूर्ण करताना आढळून येतात. मग ही तात्पुरती शौचालये उभारण्यामागचे कारण काय ? असा प्रश्न येतील स्थानिक नागरिकांना पडत आहे.
*भक्त निवास पुढील शौचालयांची ही हीच अवस्था*