राष्ट्रवादी नेते नागेश फाटे यांच्या वतीने दोन दिवस अन्नदान
आषाढीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी घेतला लाभ

पंढरपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष, मा.नागेशदादा फाटे आणि फाटे उद्योगसमूह, यांच्यावतीने आषाढी वारीनिमित्त आलेल्या भाविकांसाठी दशमी आणि एकादशी या दोन दिवशी अन्नदान करण्यात आले.
सदरचे अन्नदान हे कोर्टी रोडवरील फाटे ट्रॅक्टर्स या ठिकाणी करण्यात आले. आषाढी वारी निमित्त अन्नदान करण्याची प्रथा, ही गेले अनेक वर्षे चालू आहे. तसेच ही परंपरा यापुढेही कायम सुरू ठेवण्यात येणार आहे.
याठिकाणी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्यातून श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळा, श्री क्षेत्र रामलिंग बेट बहे यांचा हूबाळवाडी ते पंढरपूर येत असते. त्यांच्यासह या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच भाविकांना मोफत अन्नदान करण्यात आले. वरील दिंडीची सोहळ्याची व्यवस्था यापुढेही कायम परंपरा ठेवण्यात येणार आहे.
या अन्नदान वाटपाचे वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मा.नागेश फाटे, मा. संजय पवार, माजी सरपंच मा. महादेव फाटे, मा.संजय बागल बिल्डर मुंबई, दत्ता कोळेकर, संजय भास्कर बागल, हरी बागल,माणिक मस्के, शांतिनाथ अर्जुन बागल, डाॅ.रमेश फाटे , दिंडीप्रमुख संजय तात्या हुबाले, लखन कोकीळ, सुधीर रोकडे, विकास भोसले, कोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच सौ. दीपांजली संदीप पाटील, संदीप बापूसाहेब पाटील, रणजीत बागल, मोहन गुजर, माजी सरपंच मा.मल्हारी खरात, मा संचालक मा द्रोणाचार्य हाके, ह.भ.प. भगवान महाराज बागल, अभिमन्यू पवार, उमेश फाटे, निवृत्ती भटकर, विशाल मोरे, शुभम फाटे, ओंकार फाटे, शर्विन फाटे, शशांक फाटे ,औदुंबर माने, वैजिनाथ चवरे, संतोष पुणेकर, समाधान कांबळे ,उदय आदमीले, समाधान बागल,यांचेसह नागेशदादा फाटे मित्रपरिवार उपस्थित होता.