
पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्ते, आणि मूलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु ही अडचण आता दूर झाली आहे. आ. समाधान आवताडे यांनी सूचना केल्याप्रमाणे, या भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती
आ. समाधान अवताडे यांच्याकडूनच देण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाकडे आ. समाधान आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे, या भागातील रस्त्यांच्या विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील
ग्रामीण भागातील विविध रस्त्यांचे काम पूर्णत्वास जाणार आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने , ग्रामीण भागातील दळणवळणास चालना मिळणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील ढवळस, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तामदर्डी, बठाण, सिद्धापूर, वडापूर, बोराळे, डोनज, मुंढेवाडी, रहाटेवाडी, पडोळकरवाडी , भोसे, रड्डे, महमदाबाद, सलगर बुद्रुक, उमदी हद्द, लवंगी, मारोळी, जंगलगी, चिखलगी, शिरशी, नंदेश्वर, खूपसुंगी, गोणेवाडी, आंधळगाव, धरणवाडी, दामाजी नगर ,जुनोनी, मोरेवाडी, लेंडवे चिंचाळे, डोंगरगाव, हाजापुर, मारापुर, यादववाडी, शेलेवाडी, धर्मगाव, घरनिकी, मल्लेवाडी, चोखामेळा नगर, लक्ष्मी दहिवडी, जालीहाळ, भाळवणी, निंबोणी, जित्ती, होमनाळ, फटेवाडी, भालेवाडी, तळसंगी, आसबेवाडी, येळगी, शिवणगी, सलगर, सोडी, बाऊची ,यड्राव, हून्नूर, आदी गावातील छोटे छोटे रस्ते या विकास निधीतून होणार आहेत.