सिल्वर ओकमध्ये रंगल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

पंढरपूर (प्रतिनिधी)
मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, व सिल्व्हरओक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आष्टी, यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२४-२५ सिल्व्हरओक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आष्टीमध्ये मोठ्या थाटात पार पडल्या.
या तालुकास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, तालुका क्रीडाधिकारी सौ. सुप्रिया गाढवे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सचिव विनोद कदम व त्याचबरोबर, प्रमुख मान्यवर म्हणून संभाजी चव्हाण ,युवराज पोगल, सर्जेराव कवडे, नित्यानंद पाटील,निखिल गुंड,सुहास व्यवहारे,खराडे सर, शुभांगी माने ,गणेश बागल, मुख्याध्यापक विनोद कदम व कॉर्डिनेटर प्रमोद कदम हे सर्वजण उपस्थित होते.
या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये वयोगट १४ वयोगट १७, आणि वयोगट १९ वर्षांखालील मुला व मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. बुध्दिबळ स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पवार मॅडम यांनी केले. स्पर्धा पार पडल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला, व सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.