
पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक शुक्रवार दि. ९ ऑगस्ट रोजी येथील सु.रा. परिचारक पतसंस्थेत होणार असून, या बैठकीतम हत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीस कॉंग्रेसच्या सर्व फ्रंटल सेलच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे,जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.