मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढीत अन्नदान
शिवसेना नेते महेश साठे आणि राम रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी

पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी चांगल्या पद्धतीने पार पडावी, यासाठी मागील वर्षीपासून प्रशासन सतर्क करून दाखविले आहे. केवळ सरकारी खर्च नव्हे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून भाविकांना भोजन मिळावे, यासाठी स्वखर्चातून सलग तीन दिवस मोफत भोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील वर्षी पाच लाख भाविकांनी एकाच केंद्रावरून या भोजनाचा लाभ घेतला होता. त्यामुळे यावर्षीही जास्तीत जास्त भाविकांना भोजनाचा लाभ मिळावा, यासाठी या आषाढी वारीत दोन ठिकाणी अन्नदान केंद्र उभारण्यात येत आहेत. त्यामधील एक केंद्र चंद्रभागा बसस्थानक पालखी मार्गांवर, तर दुसरे गजानन महाराज पिछाडीला भक्त निवास समोर उभारण्यात येत आहे.
वरील दोन्ही केंद्राची शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या देखरेखी खाली सुरु असून, तयारी जवळपास पूर्ण होत आलेली आहे.मंगळवार दि.१६ जुलै पासून १८ जुलै पर्यंत हे मोफत भोजन वाटप होणार आहे. यामध्ये पाणी बाटली, सरबत बाटली आणि पंच पक्वन्न भोजन देण्यात येणार आहे.