मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा तीन ऑक्टोबर पासून झंझावात
मतदार संघातील मतदारांशी साधणार संवाद

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.
हा गाव भेट दौरा गुरुवार दि. ३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे. पुढे सायंकाळी ६ वाजता तपकिरी शेटफळ, रात्री ७ वाजता तनाळी, रात्री ८ वाजता तावशी, शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धेवाडी, सकाळी ९ वाजता शिरगाव, १० वाजता एकलासपुर, सायंकाळी ५ वाजता अनवली, सहा वाजता रांजणी, ७ वाजता मुंढेवाडी, ८ वाजता गोपाळपूर, शनिवार दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उंबरगाव, सकाळी ९ वाजता बोहाळी, १० वाजता कोर्टी, सायंकाळी ५ वाजता टाकळी, ७ वाजता गादेगाव.रविवार दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरढोण,९ वाजता कौठाळी, सायंकाळी ६ वाजता वाखरी, सायंकाळी ७ वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे.