
- पंढरपूर(प्रतिनिधी)
पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये आपल्या समाजकार्याचा ठसा उमटवणारे समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना, कै. माणिकराव पाटील एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘ राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार २०२४’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना सामाजिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ‘युवा समाजरत्न ‘हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.पंढरपूर शहरातील निराधार अनाथ तसेच समाजापासून दूर राहणाऱ्या अनेक समाज बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे काम, पंढरपूर येथील मेडीकल व्यवसायिक समाजसेवक मुजम्मील कमलीवाले अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या अनोख्या समाजकार्याचा ठसा मनामनावर उमटला आहे. या कार्यक्रमास शहरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक तथा संजय घोडावत विद्यापिठाचे कुलसचिव डाॅ बी.एम.हिडेंकर यांच्या हस्ते समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मानाचा भेटा,मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव, शिक्षक नेते रवी पाटील, प्रमोद तौंदकर, गौतम वर्धन , सुरेश कांबळे, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुनिता पाटील, मार्गदर्शक तुषार पाटील, सचीव धनश्री पाटील राजेंद्र पाटील ,आनंदा यादव, पांडुरंग पाटील फाऊंडेशनचे पदाधिकारी, व शिक्षक उपस्थित होते. एस. के. पाटील यांनी आभार मानले. स्वाती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कमलीवाले यांचेसर्व स्तरातून कौतुक होत आहेत.