ईतर
दुग्ध व्यवसायाबाबत आ. समाधान अवताडे घेणार मंगळवेढ्यात बैठक
दूध उत्पादक आणि संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी)
दुग्ध व्यवसाय आणि या व्यवसायातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी, आ. समाधान आवताडे बुधवारी मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक आणि दूध संस्थाचालकांची बैठक घेणार असल्याची माहिती हाती आली आहे.येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ही बैठक दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.
बुधवार दि. २६ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीस अनेक दूध उत्पादक आणि दूध संस्थाचालक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दूध दर, दूध उत्पादक आणि दूध संस्था चालकांना येणाऱ्या अडीअडचणी, आमदार आ आवताडे हे जाणून घेणार आहेत. तालुक्यातील अनेक शेतकरी व दूध उत्पादक पशुपालकांचा दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे. अनेक शेतकऱ्यांचे ते उदरनिर्वाहाचे साधन आहे. यामुळे या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या दूध उत्पादकांच्या व दूध संस्था चालकांच्या समस्या आ. समाधान अवताडे हे जाणून घेणार आहेत.
या बैठकीसाठी तालुक्यातील दूध उत्पादक आणि दूध संस्था चालकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आ. समाधान आ आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.